उत्कृष्ट संशोधक पुरस्काराने प्रा. देसाईंचा गौरव
-rat२१p६.jpg-
P२६O२६१७५
राजापूर ः प्रा. रणजित देसाई यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार देऊन गौरवताना श्री स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूरचे विद्या समितीचे प्रमुख श्रीराम साळुंखे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप आणि मान्यवर.
---------
प्रा. रणजित देसाईं यांना संशोधक पुरस्कार
राष्ट्रीय शिक्षण परिषद; गणितीय साक्षरता विषयावर संशोधन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ः ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर धाराशिव येथे झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत प्रा.देसाई यांना ‘उत्कृष्ट संशोधक पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात आले. देसाई यांनी ‘गणितीय साक्षरता’ या विषयावर केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक असोसिएशन, सोलापूर आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे श्रीमती सुशीलादेवी साळुंके कॉलेज ऑफ एज्युकेशन, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद घेण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये पीएच.डी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी उत्कृष्ट संशोधक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. त्यासाठी प्रा. देसाई यांनी केलेल्या गणितीय साक्षरता या विषयावर केलेल्या संशोधनाला पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या शिक्षणशास्त्र विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या या संशोधनाचे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या पॅनलसमोर सादरीकरण केले. त्यांचे संशोधन आणि सादरीकरणाची दखल घेत प्रा. देसाई यांना संशोधनासाठी ‘उत्कृष्ट संशोधक पुरस्कार २०२६’ जाहीर झाला. धाराशीव येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा. देसाई यांना स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार नामांकन प्रमाणपत्र, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रमाणपत्र आणि रोख ५ हजार रुपये बक्षिस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

