-सावर्डेच्या निकम विद्यालयाला राज्यस्तरीय ‘अ+’ मानांकन
निकम विद्यालयास राज्यस्तरीय ‘अ+’ मानांकन
शाळा गुणवत्ता मूल्यांकन ; सर्वांगीण विकासाच्या सहा क्षेत्रांत यश
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २१ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यांतर्गत बाह्यमुल्यांकनात गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने ‘अ+’ श्रेणी मिळवत यश संपादन केले आहे.
राज्यातील एकूण १ लाख २ हजार ६७५ शाळांनी स्वयं-मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली होती. स्वयं-मूल्यमापनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांपैकी २०२५–२६ मध्ये १० हजार ७१२ शाळांची बाह्यमुल्यांकनासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी १० हजार ६४४ शाळांचे बाह्यमूल्यांकन पूर्ण झाले असून, केवळ ४२९ शाळांना ‘अ+’ श्रेणी मिळाली आहे.
अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापन, पायाभूत सुविधा, मानव संसाधन व शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती व लिंग समभाव, व्यवस्थापन, निरीक्षण व प्रशासन तसेच लाभार्थ्यांचे समाधान या सहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विद्यालयाने सर्वांगीण यश संपादन केले. सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, संचालक मारूतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, शालेय समितीचे अध्यक्ष व विश्वस्त शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम तसेच सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी प्राचार्य राजेंद्र वारे यांनी अभिनंदन केले.
----
कोट
विद्यालयाने स्वयं-मूल्यांकन प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपक्रम राबवले. शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि व्यवस्थापनाची दूरदृष्टी यामुळेच हे यश संपादन करता आले. ‘अ+’ श्रेणी प्राप्त करून विद्यालयाने गुणवत्ता, शिस्त, उपक्रमशीलता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
--राजेंद्र वारे, प्राचार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

