संक्षिप्त पट्टा
‘पाली शाळेची
प्रगती उल्लेखनीय’
पाली ः पाली शाळा क्र. १ येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अॅड. सुयोग कांबळे यांनी सदिच्छा भेटीदरम्यान सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शालेय गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी राज्याबाहेरील अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या हर्ष धाडवे (इ. ६वी) व यश डोंगरे (७ वी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य अॅड. सागर पाखरे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, पदवीधर शिक्षक मारुती घोरपडे, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग उपस्थित होते.
कोपरी नारायण
मंदिरात योगशिबिर
गुहागर ः तालुक्यातील वरचापाट येथे २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान योगशिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री देव कोपरी नारायण देवस्थान व श्री अंबिका योग कुटीर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात आरोग्य जागृती, विविध आजारांवरील मार्गदर्शन व विनामूल्य योग प्रशिक्षण दिले जाणार असून, पहिल्या ५० जणांनाच प्रवेश असेल.
ई-स्पोर्ट्स स्पर्धेला
उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण ः चिपळूण येथील रिगल कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन ई-स्पोर्ट्स स्पर्धा उत्साहात झाली. सात संघांच्या सहभागातून झालेल्या स्पर्धेत आयटीआय विभागाचा संघ विजेता ठरला. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के आणि संचालक अनिश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत रिगल कॉलेजच्या आयटीआय विभागाचा संघ विजयी ठरला. या संघाला प्राचार्य अभिराज कबीर यांनी मार्गदर्शन केले. विजयी संघामध्ये (स्कॉड बॅटल) ओंकार विचारे, तेजस वाघे, अनिश टाकळे, सुजल पागडे आणि फहद खडस या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांच्या हस्ते पारितोषिक आणि भेटवस्तू देऊन विजेत्या संघास गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

