-राजापुरात मंडळ स्तरावर ७ मार्चपासून समाधान शिबिरे

-राजापुरात मंडळ स्तरावर ७ मार्चपासून समाधान शिबिरे

Published on

राजापुरात ७ मार्चपासून समाधान शिबिरे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ : सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार विलास सरफरे यांनी दिली.
शिबिरांचे आयोजन ७ मार्च, १४ मार्च, १० व १७ एप्रिलला मंडळ स्तरावर होणार आहे. शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी व डिजिटल सातबारा, ८ अ उतारे तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच उत्पन्न, रहिवासी, जाती व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारून प्रमाणपत्र वितरणही केले जाणार आहे. सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून ‘एक खिडकी’ प्रणालीद्वारे नागरिकांना त्वरित सेवा देणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com