जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीवरील धार्मिक फलक काढा
रुग्णालयाच्या भिंतीवरील `तो’ फलक काढा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतींवर काही धार्मिक संस्थांकडून अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक तत्काळ काढावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हिंदू राष्ट्र समन्वय समितीने दिला. त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी असे फलक लावणे अयोग्य असून ते कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे लावण्यात आलेले आहेत आणि ते हटवण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट केले.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात व इमारतींच्या भिंतींवर फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचे निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना देण्यात आले आहे. निवेदनानंतर फलक काढून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

