कुणकेरी येथे ८ मार्चला हुडोत्सवाचे आयोजन

कुणकेरी येथे ८ मार्चला हुडोत्सवाचे आयोजन

Published on

कुणकेरीत ८ मार्चला
‘हुडोत्सवा’चे आयोजन
सावंतवाडी, ता. २१ : तालुक्यातील कुणकेरीचा प्रसिद्ध ‘हुडोत्सव’साठी ८१०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. या उत्सवानिमित्त विविध परंपरागत कार्यक्रम पार पडतात. ‘हुडोत्सवा’च्या मुख्य दिवशी भावईदेवीच्या निवासस्थानी देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी रोंबाट, तर आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाच्या भेटीसह कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिरकडे येणार आहेत. सायंकाळी हुड्याजवळ ‘घोडेमोडणी’ व लूटूपुटूचा खेळ होणार असून १०० फुटी हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने ‘हुडोत्सवा’ची सांगता होणार आहे. भाविकांनी ‘हुडोत्सव’ आणि ‘श्री’ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान समिती आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com