होळीनिमित्त कोकणात एसटीच्या १९८ जादा फेऱ्या

होळीनिमित्त कोकणात एसटीच्या १९८ जादा फेऱ्या

Published on

होळीनिमित्त एसटीच्या १९८ जादा फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २१ : होळीच्या सणासाठी कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. एसटी प्रशासनाने ‘होळी जादा ऑपरेशन २०२६’अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन जाहीर केले आहे.
हे नियोजन २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीसाठी असणार आहे. या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागातून करण्यात आले आहे. ठाणे विभागातून तब्बल ७९ फेऱ्या नियोजित असून, त्यापैकी ७१ फेऱ्यांचे आताच आगाऊ आरक्षण झाले आहे. मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित असून, ३७ फेऱ्या आरक्षणाने भरल्या आहेत, तर २५ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी समर्पित आहेत. या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवसांत अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारीला तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्चला ५९ फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com