सीए, करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलचे उद्घाटन

सीए, करसल्लागारांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलचे उद्घाटन

Published on

-rat२१p१.jpg-
२६O२६१६०
रत्नागिरी : सीए, करसल्लागारांच्या स्पोर्टस कार्निव्हलचे उद्‍घाटन करताना प्रसाद देवस्थळी. सोबत श्रीरंग वैद्य, रवींद्र साळवी, उज्ज्वल बापट, दिनकर माळी, केदार करंबेळकर, शरद वझे आदी.
------
स्पोर्टस कार्निव्हलने रत्नागिरीत रंगत
रत्नागिरीत आयोजन ; सीए–करसल्लागारांचा सहभाग
सकाळ वृतसेवा
रत्नागिरी, ता. २२ : सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखा आणि करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पोर्टस कार्निव्हलचे उद्‍घाटन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक व धावपटू प्रसाद देवस्थळी यांच्या हस्ते झाले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. क्रिकेटच्या मैदानावर श्रीफळ वाढवून देवस्थळी यांनी उद्‍घाटन केले. त्यांनी या प्रसंगी सांगितले की, कोणत्याही संस्थेचे सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन सीए, करसल्लागार करत असतात. सर्व सीए, करसल्लागार हे शारीरिकदृष्ट्या सक्षम असले की, संस्थेलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी फायदा होत असतो. यात स्पोर्टस कार्निव्हल हा एक मैलाचा दगड आहे.
स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे एंजल वनचे चॅनेल पार्टनर राजेश सोहोनी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. याबद्दल त्यांचे आभार पाथरे यांनी मानले. या वेळी करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे, सचिव ॲड. रवींद्र साळवी, खजिनदार सीए ऋषिकेश फडके, कार्यकारिणी सदस्य ॲड. उज्ज्वल बापट, चैतन्य वैद्य, राजेंद्र भावे, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखाध्यक्ष मंदार जोशी यांच्यासमवेत पदाधिकारी, भूषण मुळ्ये, श्रीरंग वैद्य आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com