-ताम्हाने परिसरावर सीसीटीव्हीची नजर

-ताम्हाने परिसरावर सीसीटीव्हीची नजर

Published on

ताम्हाणे परिसरावर
सीसीटीव्हीची नजर
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे ग्रामपंचायतीने विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ताम्हाणे परिसरात सहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे या परिसरातील हालचालींवर आता सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. कोसुंब ते तुळसणी या मार्गाला ताम्हाणे, नांदळज, उजगाव, धामापूर, आंबवली, सांगवे, फणसट, कुडवली ही गावे जोडलेली आहेत. यातील ताम्हाणे हे गाव मध्यवर्ती ठिकाणी आहे. या मध्यवर्ती ठिकाणी शाळा, विद्यालय, बाजारपेठ, दवाखाना, पतपेढी, ग्रामपंचायत कार्यालय असल्याने विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांची सतत ये-जा असते. हे लक्षात घेऊन गैरप्रकारावर आळा घालण्याबरोबरच अन्य घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ताम्हाणेफाटा (बाजारपेठ) येथे तीन, ताम्हाणे ग्रामपंचायत व विद्यालय परिसरात तीन असे एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने विशेष पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com