-चिपळुणातील गावांमध्ये ५ जी नेटवर्कची मागणी

-चिपळुणातील गावांमध्ये ५ जी नेटवर्कची मागणी

Published on

चिपळुणात ५ जी नेटवर्कची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : शहरासह ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे; मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्ययावत इंटरनेट सुविधा अपुरी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये बीएसएनएलमार्फत ५जी इंटरनेट नेटवर्क उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिरगावचे सुरजराव शिंदे यांनी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली आहे.
दूरसंचार विभागाच्या अहवालानुसार, तालुक्यातील १६७ महसुली गावांपैकी १६४ गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध आहे. यामध्ये ११५ गावांत २जी, २१ गावांत ३जी, १६३ गावांत ४जी तर ९६ गावांत ५जी सेवा आहे. तिवडी, मजरेगोवळ आणि अनारी या तीन गावांत अद्याप नेटवर्क सुविधा नसल्याचे नमूद करण्यात आले असून, तेथे मोबाईल टॉवर उभारणी प्रस्तावित आहे. दरम्यान, विभागाने दिलेली माहिती विसंगत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तळवडे गावात इंटरनेट सुविधेअभावी ग्रामसभेत मतदानावर बहिष्काराचा इशाराही देण्यात आला होता. शिक्षण, शेती, व्यवसाय आणि शासकीय कामकाजासाठी प्रभावी इंटरनेट आवश्यक असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व गावांत सक्षम इंटरनेट सेवा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com