उभादांडा सागरेश्वर किनारी 
रोटरी क्लबतर्फे रेस्क्यू टॉवर

उभादांडा सागरेश्वर किनारी रोटरी क्लबतर्फे रेस्क्यू टॉवर

Published on

26189

उभादांडा सागरेश्वर किनारी
रोटरी क्लबतर्फे रेस्क्यू टॉवर

वेंगुर्ले, ता. २१: येथील रोटरी क्लबमार्फत उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी उभारल्या जाणाऱ्या रेस्क्यू टॉवरचे भूमिपूजन शुक्रवारी वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप व उभादांडा सरपंच नीलेश चमणकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी रोटरी वेंगुर्ला प्रेसिडंट आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ राजेश्वर उबाळे, ट्रेजरर अनमोल गिरप, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ उपस्थित होते. भविष्यात सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात समुद्रात बुडून होणाऱ्या दुर्घटना टाळणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रोटरी माजी अध्यक्ष राजू वजराटकर, पंकज शिरसाट, डॉ. वसंतराव पाटोळे, दिलीप शितोळे आदी उपस्थित होते. पर्यटक, नागरिक व मत्स्यव्यावसायिकांच्या जीवित संर‌क्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या या रोटरी प्रोजेक्टसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांनी २५ हजाराची रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रॅंट मंजूर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com