बालनेत्र विशेषज्ञ डॉ. देशपांडे २६ पासून रत्नागिरीत
बालनेत्र विशेषज्ञ डॉ. देशपांडे
२६ पासून रत्नागिरीत
इन्फिगोचा पुढाकार ; तिन दिवस तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः डोळ्यात तिरळेपणा असला तर वर्गातली मुलं चकण्या म्हणून चिडवतात आणि चष्मा असेल तर ढापण्या म्हणून नकोसे करतात. अशा मुलांच्या अभ्यासावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर रुग्णालयाने डोळ्यांचा तिरळेपणा, आळशी डोळे आणि अन्य नेत्रदोषाबाबत तीन दिवसांचे विशेष शिबिर २६ पासून रत्नागिरीत आयोजित केले आहे. अखिल भारतीय स्तरावर बाल नेत्र रोग विशेषज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. प्रदीप देशपांडे या शिबिरात नेत्र रुग्णांची तपासणी करणार आहेत.
डोळ्यांचा तिरळेपणा, आळशी डोळे तसेच अन्य नेत्रदोषांवरील उपचारांचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. देशपांडे यांनी आतापर्यंत एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. मुलांमधील डोळ्यांचा तिरळेपणा शस्त्रक्रियेने दूर करता येतो. ही शस्त्रक्रिया वय कमी असतानाच झाली तर त्याचा अधिक फायदा होतो. त्यामुळे दृष्टीच्या अनुषंगाने मुलाचे पुढील आयुष्य अधिक सुखकर होते. केवळ लहान मुलीचे नाही तर, मोठ्या व्यक्तींच्या डोळ्यांचा तिरळेपणा शस्त्रक्रियेने घालवता येतो. डॉ. देशपांडे २६, २७ आणि २८ फेब्रुवारीला रत्नागिरीतील आणि १ मार्च रोजी खेडमधील इन्फिगो आय केअर रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत. तिरळेपणा, आळशी डोळे किंवा नेत्रदोष असलेल्या मुलांच्या पालकांनी रत्नागिरी व खेड रुग्णालयाशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन इन्फिगो आय केअर रुग्णालयातर्फे केले आहे.
चौकट
ठराविक टप्प्यांवर तपासणी
डोळे हा आपला खूप महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे ठराविक टप्प्यांवर त्याची तपासणी होणे गरजेचे आहे. मूल जन्माला आल्यानंतर, त्याला शाळेत दाखल करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांची तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा डोळ्यांच्या समस्या गांभीर्याने पाहिल्या जात नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

