१४०० किलो फुलांनी चंडिका देवीची सजावट

१४०० किलो फुलांनी चंडिका देवीची सजावट

Published on

rat22p4.jpg
26325
संगमेश्वर ः तालुक्यातील गोळवली येथे श्री देवी चंडिका पडळकरीन या ग्रामदेवतेचा नूतन मंदिर प्राणप्रतिष्ठापनेवेळी केलेली आकर्षक सजावट.

१४०० किलो फुलांनी चंडिका देवीची सजावट
गोळवलीवासीयांचा उपक्रम ; नूतन मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः तालुक्यातील गोळवली येथे श्री देवी चंडिका पडळकरीन या ग्रामदेवतेचा नूतन मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत अत्यंत भक्तीमय आणि पवित्र वातावरणात झाला. मंत्रोदचार, होमहवन आणि विविध धार्मिक विधींनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यानिमित्त मंदिरात करण्यात आलेली फुलांची भव्य सजावट भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराची आणि स्तंभांची करण्यात आलेली मनमोहक सजावट. गोळवली कोंड-करंडे वाडीतील युवक जयवंत दाजी करंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही सजावट साकारली होती. यासाठी सुमारे १३०० ते १४०० किलो फुलांचा वापर करण्यात आला. सजावटीसाठी ९०० किलो झेंडू (गोंडा), ३०० बंडल जरबेरा आणि ५० बंडल गुलाब, १२० नग छोटे केळंबे आणि ६० बंडल रामबन, ५०० बंडल कामिनी आणि १०० कलकत्ता पाने वापरण्यात आली होती.
सलग तीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ही सजावट पूर्ण करण्यात आली. यासाठी अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला असून, जयवंत करंडे यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. "अशा प्रकारची भव्य सजावट करणारा कलाकार आमच्या गावातच असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे," अशी भावना स्थानिक उद्योजक विवेक (गुंडू) पाध्ये यांनी व्यक्त केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत जयवंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गावप्रमुख दत्ताराम दुदम, शंकर दुदम, मानकरी विनोद पाध्ये, माजी पोलीस पाटील अप्पा पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वाडीप्रमुख, तरुण कार्यकर्ते, महिला मंडळ आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. या सोहळ्यामुळे गोळवली गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

चौकट
धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
तीन दिवसांच्या या सोहळ्यात विविध धार्मिक विधींसोबतच भजन, आरत्या, हरिपाठ आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ''नमन'' या लोककलेचा कार्यक्रम पार पडला, तर महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com