गोदावरीदेवी बियाणी यांचा स्मृतीदिन

गोदावरीदेवी बियाणी यांचा स्मृतीदिन

Published on

rat22p1.jpg-
26322
रत्नागिरी : गोदावरीदेवी बियाणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित चित्रकला, रंगभरण स्पर्धेतील विजेत्या बालदोस्तांसह आनंद बियाणी, अर्चना बियाणी आणि संस्था पदाधिकारी.

गोदावरीदेवी बियाणी यांच्या
स्मृतीदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी, ता. २२ : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिरामध्ये गोदावरीदेवी भ. बियाणी यांच्या स्मृती दिनानिमित्त चित्रकला व रंग भरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
आनंद बियाणी व अर्चना बियाणी यांचा भारत शिक्षण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ. बियाणी यांनी विविध उपक्रम घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने आनंद व्यक्त केला. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी श्रीराम भावे, चंद्रकांत घवाळी, राजेंद्र कदम, संजय चव्हाण, सतीश दळी, सनातन रेडीज, प्रबंधक विनायक हातखंबकर, दादा वणजु, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, करसल्लागार रसिकलाल शहा उपस्थित होते. समर्थ भारत अभियान राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन सुविधा नार्वेकर यांनी केले. अपर्णा गोगटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com