सहा पाणीपुरवठा योजनांना ६ कोटी ३६ लाख

सहा पाणीपुरवठा योजनांना ६ कोटी ३६ लाख

Published on

26478

सहा पाणीपुरवठा योजनांना ६ कोटी ३६ लाख
जल जीवन मिशन ; लांजा, राजापूर, गुहागरमधील कामांना गती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर आणि गुहागर या ३ तालुक्यांमधील एकूण ६ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी ६ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. १७ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या रखडलेल्या कामांना आता मोठी गती मिळणार आहे.
तिन्ही तालुक्यातील सहाही पाणी योजनांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करताना आलेली विविध तांत्रिक कारणे आणि साहित्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळे मूळ अंदाजपत्रकात वाढ झाली होती. या वाढीव खर्चाला मंजुरी मिळावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांना शासनाने हिरवा कंदील दिला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे ‘जल जीवन मिशन’चे उद्दिष्ट आहे. सुधारित मान्यतेअभावी काही ठिकाणी कामे धिम्या गतीने सुरू होती किंवा थांबली होती. आता भरीव निधी उपलब्ध झाल्याने पावसाळ्यापूर्वी या योजनांची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.


चौकट

तालुकानिर्णय मंजूर निधी असा -

तालुका गाव / योजना मंजूर निधी (रुपये)
लांजा मठ (कडूगाव) ६९ लाख १४ हजार
लांजा केळंबे १ कोटी ३२ लाख ५१ हजार
लांजा पालू (माचाळ) १ कोटी ७९ लाख ८३ हजार
लांजा बनखोर १ कोटी १३ लाख ६३ हजार
राजापूर विल्ये (शेंगाळेवाडी) ६७ लाख ९० हजार
गुहागर रानवी ७३ लाख ४४ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com