राधिका रांगडेला जेईई परिक्षेत 96.49 गूण

राधिका रांगडेला जेईई परिक्षेत 96.49 गूण
Published on

rat22p9.jpg-
26344
राधिका रांगडे

राधिका रांगडेचे
जेईई परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २२ : तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित, ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी राधिका रांगडे हिने जेईई मेन २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत ९६.४९ पर्सेंटाईल गुण मिळवून संस्थेचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई मेन ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवणे हे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक असते. राधिका रांगडे हिने आपली जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे.
ज्ञानदीप संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. राधिकाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक तसेच परिसरातील नागरिकांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळणार असून, भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ज्ञानदीप संस्थेच्या वतीने राधिका रांगडे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com