रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धा
राज्य नाट्य स्पर्धा - लोगो
फोटो ओळी
rat22p10.jpg-
26377
रत्नागिरी ः सेजल एंटरटेनमेंट या संस्थेने सादर केलेल्या ब्रेकपॉईंट या नाटकातील एक क्षण.
लेखकाच्या लिखाणाचे
आत्मपरिक्षण ''ब्रेकपॉईंट''
सेजल एंटरटेनमेंट ; नेपथ्य, अभिनयाला रसिकांची दाद
लेखकाने केवळ कल्पनाविलास न करता वास्तव समजून आणि संवेदनशीलतेने लेखन करणे काळाची गरज आहे. समाजातील अन्यायाकडे दुर्लक्ष करून केलेले लेखन नेहमीच अपूर्ण असते, कारण अखेर सत्य आणि न्याय यांनाच सर्वोच्च महत्त्व असते, हाच संदेश लेखक-दिग्दर्शक सागर माने यांनी ''ब्रेकपॉइंट'' या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडला. राज्य नाट्य स्पर्धेत सेजल एंटरटेनमेंट या संस्थेने हे नाटक सादर केले. कलाकृती सादर करताना लेखकाची सामाजिक जबाबदारी, लेखनातील नैतिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध समाजभावना यांच्यातील अटळ संघर्ष यावर या संहितेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रयोगातील कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयातून लेखकाचा मूळ आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. पात्रांच्या मानसिक संघर्षाचा उलगडा अभिनयाद्वारे ज्या पद्धतीने झाला, त्याला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात मोठी दाद दिली.
- नरेश पांचाळ, रत्नागिरी
----------
काय आहे नाटक ?
लेखकाची सामाजिक जबाबदारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाकाराच्या मनातील वैचारिक द्वंद्व मांडणारे ''ब्रेकपॉइंट'' हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत विशेष चर्चेत राहिले. सेजल एंटरटेनमेंट या संस्थेने सादर केलेल्या या नाटकाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर समाजातील न्याय-अन्याय आणि लेखकाच्या नैतिकतेवरही भाष्य केले.
नाटकाची कथा नाटककार अभिराम याच्याभोवती फिरते. पडदा उघडताच, लेखनावरील निष्ठेमुळे ओढवलेली विदारक परिस्थिती समोर येते. अभिरामच्या एका नाटकातील वादग्रस्त संवादामुळे काही समाज घटकांच्या भावना दुखावल्या जातात, परिणामी नाटकाचे प्रयोग बंद पडतात आणि त्याच्या घरावर दगडफेक होते. या संकटकाळात मित्र शशांक आणि नाट्यनिर्माते दांडेकर त्याला नाटकातील प्रसंग बदलण्याचा सल्ला देतात, मात्र अभिराम आपल्या लेखनावर ठाम राहतो. या मानसिक तणावातून अभिरामला स्वतःच्या नाटकातील काल्पनिक पात्रे जिवंत भासू लागतात. ही पात्रे त्याच्याशी संवाद साधतात आणि त्याच्या लेखनातील त्रुटी व अन्याय त्याला दाखवून देतात.
नाटकाच्या उत्तरार्धात अभिराम ''वसुधा देशमुख'' या शिक्षिकेच्या मुलीवर (अलका) गावातील पुढाऱ्याने (तात्यासाहेब) केलेल्या अत्याचारावर नवीन संहिता लिहितो. सुरुवातीला पुराव्याअभावी तात्यासाहेब सुटतात असा शेवट तो लिहितो, मात्र जिवंत भासणारी पात्रे त्याला या अन्यायाची जाणीव करून देतात. अखेर स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून आणि आत्मपरीक्षण करून अभिराम नाटकाचा शेवट बदलतो. नव्या शेवटी तात्यासाहेबांचे कृत्य सिद्ध होऊन त्यांना शिक्षा होते. सत्य आणि न्यायाचा विजय दाखवून अभिराम एका अर्थाने लेखकाची सामाजिक जबाबदारी पूर्ण करतो.
-------
* सूत्रधार आणि साहाय
सहाय्यक दिग्दर्शक: सुमित घाग, प्रतिनिधी: केतन परब, नेपथ्य : यश मोडक, प्रकाश योजना : साई शिर्सेकर, पार्श्वसंगीत : सागर माने, स्विकार पाटील, साहिल खेडस्कर, वेशभूषा : चंचल शिंदे, रंगभूषा : वर्षा जाधव, संगीत संयोजन : सुजित सामंत, अनिकेत तांबे, श्रीधर पाचंगे, गायक : नंदकुमार गोगटे, रंगमंच व्यवस्था : थिएटरवाले, मुंबई. विशेष आभार : रंगखांब, कणकवली.
--------
* पात्र परिचय
अभिराम : सुमित घाग, शशांक : स्वीकार पाटील, एरिस्टोफेन्स : महेश गायकवाड, युपोलिस : केतन परब, चिवे : चार्वी शिंदे, इशिका : पूनम ओव्हाळ, डॉ. जोशी : मानसी नाईक, कमल : श्वेता सावंत-देसाई, स्वप्ना : संचिता जोशी, यशवंत : रितिक रावते, हिप्नोज : काजल सावंत, चंदा : शुभांगी देसाई-पवार, दांडेकर : प्रसंजित मोहिते, वसुधा : प्रतिमा राणे, लंगड्या : साहिल खेडस्कर, तात्यासाहेब : सागर माने, अलका : श्रुती नाईक, न्यायाधीश : जयराम फड, लेखकाची पात्रे : अमेय कुलकर्णी, आर्यन दंडवते, वर्षा जाधव, सागर आहिरे, गोरख म्हात्रे, संपदा दांडुक.
-------
* आजचे नाटक
नाटक : दास्ता, सादरकर्ते : सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान, लातूर. वेळ : सकाळी ११.३० वाजता. नाटक : डोंगरार्त, सादरकर्ते : सुस्वानंद कला प्रतिष्ठान. वेळ : सायंकाळी ७.३० वाजता. स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

