कणकवलीत समई नृत्‍य कलाविष्कार

कणकवलीत समई नृत्‍य कलाविष्कार

Published on

26408


समई नृत्‍यातून महिलांचा कलाविष्कार

कणकवलीतील श्रीमहापुरूष मंदिराचा रौप्य महोत्‍सव

कणकवली, ता.२२ : शहर बाजारपेठेतील श्रीमहापुरूष मंदिराच्या रौप्य महोत्‍सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात किंजवडे (ता.देवगड) येथील पावणादेवी मंडळाच्या महिलांनी बहारदार समईनृत्‍य सादर केले. त्‍याला उपस्थितांकडून जाेरदार दाद मिळाली.
श्रीकलेश्‍वर दशावतार मंडळाने ‘एकपदा अर्थात पृथ्वीकंकण’ हा नाट्यप्रयोग सादर केला. त्‍यालाही रसिकांची उत्स्‍फूर्त दाद मिळाली.
महापुरूष मंदिराच्या रौप्यमहोत्‍सवी कार्यक्रमाचे उद्‌घाटन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. यावेळी नगरसेविका सुप्रिय नलावडे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, सुमेधा अंधारी, आर्या राणे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्नील राणे, मनस्वी ठाणेकर, संजय कामतेकर यांच्यासह महापुरुष मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, माजी अध्यक्ष राजू सापळे, राजन पारकर, सचिव महेंद्र सांब्रेकर, खजिनदार मंदार सापळे, राजू मानकर, चैताली मुंज, वैशाली काणेकर, अमित सापळे, साकेडीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम, प्रद्युम मुंज, चेतन अंधारी, निखिल घेवारी, सोहम वाळके, उदय मुंज, विशाल उर्फ दादा मुंज, अक्षय डिचोलकर, संदीप अंधारी, वृषभ मेनकुदळे, महेश अंधारी, प्रसन्ना देसाई, हरीष उचले, रोशन मांगले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com