क्षमा रेडकर यांची 
थायलंड मास्टर 
गेम्ससाठी निवड

क्षमा रेडकर यांची थायलंड मास्टर गेम्ससाठी निवड

Published on

26434

क्षमा रेडकर यांची
थायलंड मास्टर
गेम्ससाठी निवड
मालवण : नाशिक येथे झालेल्या नॅशनल मास्टर गेम्स या स्पर्धेत मुंबईच्या निवृत्त महिला पोलिस अंमलदार आणि मालवणच्या स्नुषा क्षमा रेडकर यांनी नेत्रदीपक कामगिरी करत धावणे, रिले व कबड्डी अशा विविध क्रीडा प्रकारांत सुवर्ण, रजत व कांस्य पदके पटकावली. या कामगिरीमुळे थायलंड येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल मास्टर गेम्स २०२६’ या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नॅशनल मास्टर गेम्समध्ये रेडकर यांनी विविध क्रीडा प्रकारांत आपली चमक दाखवली. महिला रिले स्पर्धेत सुवर्ण तसेच कबड्डी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. तसेच ४०० मीटर धावणेमध्ये रजत, ८०० मीटर धावणेमध्ये रजत, ५००० मीटर धावणेमध्ये रजत, मिक्स रिलेमध्ये कांस्यपदक मिळविले. जीतो-समृद्धी रन टू क्युअर मॅरेथॉन २०२६, नेव्ही मॅरेथॉन, टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन या स्पर्धांमध्येही सहभाग घेत उत्तम कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांची थायलंड येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मास्टर गेम्ससाठी निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com