संविधानामुळे महिलांना नेतृत्वाची संधी

संविधानामुळे महिलांना नेतृत्वाची संधी

Published on

26443

संविधानामुळे महिलांना नेतृत्वाची संधी

प्राची ईसवलकर ः खारेपाटणमध्ये लोकप्रतिनिधींचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : मला माझ्या राजकीय कारकिर्दीत जेवढी पदे मिळाली, ती सर्व भारतीय संविधानाचे देणं असून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे उपकार या देशावर आहेत. त्यांच्यामुळेच एक सर्वसाधारण महिला सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत पोहोचू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर यांनी केले.
खारेपाटण येथे आयोजित सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पंचशीलनगर येथील बुद्धविहारात नवनिर्वाचित खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर व पंचायत समिती गुरुप्रसाद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. पंचशील विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर खारेपाटण बौद्धजन सेवा संघ माजी अध्यक्ष यशवंत कांबळे, पंचशील विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, ग्रामपंचायत माजी सदस्य योगेश पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर, उपाध्यक्ष सायली तुरळकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, सचिव सागर पोमेडकर, संतोष पाटणकर आदी उपस्थित होते. प्राची ईसवलकर व शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात ईसवलकर यांचा भरत पाटणकर यांच्या हस्ते तर शिंदे यांचा संकिता पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर, मधुकर पाटणकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. मला मिळालेल्या संधीचा उपयोग प्राधान्याने येथील जनतेच्या विकासासाठी करेन, असे गुरुप्रसाद शिंदे यांनी सांगितले. मंडळाच्यावतीने नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संतोष पाटणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com