‘सायबर’ फसवणुकीपासून सतर्क राहा
26459
‘सायबर’ फसवणुकीपासून सतर्क राहा
निसर्ग ओतारी : वेंगुर्ले ‘होमिओपॅथिक’मध्ये कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ : इंटरनेट किंवा संगणक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून, गुन्हेगार जेव्हा लोकांची वैयक्तिक माहिती चोरतात, त्यांची आर्थिक फसवणूक करतात, तेव्हा त्याला सायबर क्राईम म्हणतात. याबाबत सुरक्षितता बाळगण्यासाठी अनोळखी व्यक्तीला आपला पासवर्ड किंवा बँकेची माहिती देऊ नका. संशयास्पद लिंकवर क्लिक अथवा अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. आपले पासवर्ड वेळोवेळी बदला, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी येथे केले.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजीव लिंगवत यांनी तंत्रज्ञान आपल्या हाताशी आहे; पण त्याचा वापर करताना सावध राहणे ही आपली जबाबदारी आहे. ‘सतर्कता’ हाच सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचा एकमेव उपाय असून, सायबर गुन्हा घडल्यास लगेचच घाबरून न जाता तातडीने १९३० या नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करून माहिती द्यावी, असे सांगितले.
पोलिस निरीक्षक ओतारी यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारची शस्त्रे व त्याने होणाऱ्या जखमा, पोलिसांच्या अखत्यारीत येणारे कायदे, एफ.आय.आर. याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र पोलिस कायदा अंतर्गत काम करतात, जो राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, अधिकार यात सार्वजनिक ठिकाणी रहदारी व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि इतर प्रतिबंधात्मक कलमे याबाबत माहिती दिली. कार्यशाळेचे स्वागत पोलिस निरीक्षक ओतारी यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. लिंगवत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

