प्रति हेक्टरी पाच लाख  
नुकसानभरपाई द्यावी

प्रति हेक्टरी पाच लाख नुकसानभरपाई द्यावी

Published on

प्रति हेक्टरी पाच लाख
नुकसानभरपाई द्यावी

आंबा बागायतदारांची मुंबईत मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ : यंदाच्या आंबा हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत प्रति झाड ५ हजार रुपये, तर हेक्टरी ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. तसेच पीककर्ज मर्यादा वाढवून देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या असल्याची माहिती येथील आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे यांनी दिली.
श्री. रुमडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आंबा हंगामाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पालकमंत्री श्री. राणे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला कृषी विभागातील अधिकारी, शास्त्रज्ञ, तसेच आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ पदाधिकारी, आंबा बागायतदार उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाली. यावर्षी आंबा पीक घटणार आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे प्रति झाड ५ हजार रुपये आणि हेक्टरी ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. पीक कर्ज मर्यादा वाढवून मिळावी. कीटकनाशक पृथ:करण करणारी प्रयोगशाळा उभी करण्यात यावी, आदी अनेक मागण्या करण्यात आल्या.
यावेळी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे, सचिव संकेत लब्दे, चंद्रकांत गोईम, शुभम चौगुले, हरिश्चंद्र गोडे, धनंजय गोडे, विजय तांबे, गौरव गोइम आदी उपस्थित होते. दरम्यान, फार्मर आयडी ‘ई पीक पाहणी व पोट खराबा’ आदी नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी नुकसानभरपाई देताना वगळण्यात याव्यात, अशीही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com