''विजयदुर्ग ग्रामविकास''तर्फे
शिवप्रेमी मंडळांचा सन्मान

''विजयदुर्ग ग्रामविकास''तर्फे शिवप्रेमी मंडळांचा सन्मान

Published on

26476

‘विजयदुर्ग ग्रामविकास’तर्फे
शिवप्रेमी मंडळांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने, किल्ले विजयदुर्ग दीपोत्सवामध्ये सहभागी होऊन सहकार्य करणाऱ्या तसेच देवगड तालुक्यातील प्रसिद्ध शिवप्रेमी मंडळांचा विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यामध्ये श्री नवलादेवी शिवभक्त उत्साही ग्रामस्थ मंडळ, सडेवाघोटण, शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ, नाडण वरची पुजारेवाडी, श्री काळकाईदेवी क्रिकेट मंडळ कलंबई, शिवाजी तरुण मंडळ बाऊळवाडी सौंदाळे, गिर्ये कोठारवाडी विकास मंडळ, चौगचारवाडी मित्रमंडळ विजयदुर्ग या शिवप्रेमी मंडळांना भेट देऊन गौरविले. मंडळाच्या उपस्थित सदस्य व पदाधिकाऱ्यांचे शिवप्रेमी मंडळांने स्वागत करून श्रीफळ, शाल देऊन सत्कार केला. शिवजयंती उत्सव मंडळ, कलंबईच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमा देऊन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला. शिवप्रेमी मंडळांचे मुंबई अध्यक्ष नितीन जावकर, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, कार्याध्यक्ष राजाराम सकपाळ, सचिव योगिता परुळेकर, सहसचिव छाया पटेल, अभिजीत जावकर, बाळगौरव मणचेकर, प्रियांका निकम, जयवंत डोंगरे, गौरी मणचेकर, सत्यवान कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com