''युवा मंडळ विकास''मध्ये 
सहभाग घेण्याचे आवाहन

''युवा मंडळ विकास''मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन

Published on

‘युवा मंडळ विकास’मध्ये
सहभाग घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : केंद्राच्या ‘मेरा युवा भारत’ या स्वायत्त संस्थेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘युवा मंडळ विकास कार्यक्रम’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ७० युवा मंडळे स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जास्तीत जास्त मंडळांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
युवा मंडळ स्थापन करण्यासाठी सदस्यांचे वय १५ ते २९ वर्षे दरम्यान असावे. एका मंडळात किमान ७ सदस्य असणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दोन्ही प्रकारची मंडळे यासाठी पात्र असतील. एका गावात जास्तीत जास्त दोन युवा मंडळांना मान्यता दिली जाईल. हे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी होणाऱ्या मंडळांना केंद्राच्या ‘माय भारत’ प्लॅटफॉर्मद्वारे विविध संधी उपलब्ध होतील. यात नेतृत्व विकास प्रशिक्षण, विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची संधी, शासकीय योजनांचा थेट लाभ यांचा समावेश असेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या मंडळांना प्रामुख्याने संधी दिली जाईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, ॲड. रत्नदीप कदम या समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com