संगमेश्वर-देवरूख आराखड्यात नागरिकांना विश्वासात घ्या
देवरूखच्या विकासात
नागरिकांना विश्वासात घ्या
विशेष सभेत चर्चा ; हरकतींसाठी मुदतवाढ देण्याची मागणी
संगमेश्वर, ता. २२ ः देवरुख शहराचा विकास आराखडा आणि सर्वांगीण प्रगतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘आपलं देवरुख सुंदर देवरुख’ ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (ता. २०) विशेष सभा झाली. श्री सद्गुरू लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या सभेत, नगरपंचायतीने नागरिकांना विश्वासात घेऊन आणि कोणावरही अन्याय न करता विकास आराखडा राबवावा, अशी ठाम भूमिका घेण्यात आली.
देवरूख येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत होते. डॉ. सरदार पाटील यांनी प्रोजेक्टरच्या साहाय्याने संपूर्ण विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. आराखड्याची गरज, त्यातील तांत्रिक बाबी आणि शहराच्या भविष्यातील भौगोलिक व सामाजिक परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. युयुत्सू आर्ते यांनी नगरपंचायतीने आरक्षणाबाबत नागरिकांना पूर्वकल्पना देण्याची गरज होती, असे मत व्यक्त केले. अध्यक्ष सदानंद भागवत यांनी हरकती सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या वेळी नितीन शेडगे, निखिल कोळवणकर, मुन्ना शेठ, बांडागळे गुरुजी आणि सरताज कापडी यांनी आरक्षणासंबंधी कायदेशीर व महत्त्वाचे मुद्दे मांडले. विकास आराखडा तयार करताना सर्वसामान्यांचे हित जपले जावे, असा सूर सभेत उमटला. विकास आराखड्यावरील हरकतींसाठी मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सह्यांसाठीचे पत्र क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांच्याकडे उपलब्ध ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

