कराओके स्पर्धेमध्ये प्रशांत हाडकी प्रथम

कराओके स्पर्धेमध्ये प्रशांत हाडकी प्रथम

Published on

swt2229.jpg
26550
तळेरे ः येथील रत्नसिंधू कराओके स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसोबत उपस्थित मान्यवर.

कराओके स्पर्धेमध्ये
प्रशांत हाडकी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २३ : तळेरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या रत्नसिंधू कराओके स्पर्धेत शिरोडा येथील प्रशांत हाडकी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला २७ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन झाल्यानंतर प्रमुख व्याख्याते डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, मारुती वळंजू, अशोक तळेकर, तेजस जमदाडे, प्रवीण वरुणकर, सुयोग तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, शशांक तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री क्लासेस आणि श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन्सच्या मुलांनी शिवरायांच्या चरित्रावर आधारित वेशभूषा साकारल्या. स्पर्धेत व्दितीय शांताराम साटेलकर (म्हापण), तृतीय ओम खटावकर (तळेरे), उत्तेजनार्थ गौरेश घावनळेकर (घावनळे), रुपेश कल्याणकर (लोरे), सुनील गोवेकर (कणकवली) यांना अनुक्रमे गौरविण्यात आले. परीक्षण विश्रांती कोयंडे यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, जामसंडे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक संजय पांचाळ, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com