चिपळूणात सुवर्ण मुखवट्याची वाजत-गाजत मिरवणूक

चिपळूणात सुवर्ण मुखवट्याची वाजत-गाजत मिरवणूक

Published on

-ratchl२३१.jpg-
२६O२६६६२
चिपळूण ः शहरातून गोळकोटदरम्यान काढण्यात आलेली शोभायात्रा.
----
चिपळुणात सुवर्ण मुखवट्याची मिरवणूक
श्री देव सोमेश्वर, करंजेश्वरी देवस्थान; ढोलताशांच्या गजराने दुमदुमले गोवळकोट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व आदिशक्ती श्री करंजेश्वरी देवस्थानला भाविकांकडून प्राप्त झालेल्या सुवर्णदानातून ९०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुखवटा साकारण्यात आला आहे. या मुखवट्याची आज चिपळूण शहरातून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि भाविकांच्या उत्साहामुळे ही यात्रा शहरात आकर्षणाचे केंद्र ठरली. गोवळकोट येथील मंदिरात या मुखवट्याचे आगमन झाले.
देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर व सर्व विश्वस्त, पेठमाप, मजरेकाशी आणि गोवळकोट येथील हजारो भाविक, देवीचे कुळभक्त अशा सर्वांची या वेळी मोठी गर्दी उसळली होती. चिपळूणचे श्रद्धास्थान श्री जुना कालभैरव देवस्थान येथून ही यात्रा वाजतगाजत निघाली. शिवसृष्टीला अभिवादन करून चिंचनाकामार्गे बाजारपेठ, बाजारपूल, गोवळकोट रोडमार्गे सायंकाळी उशिरा देवस्थानात पोहोचली. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारे भक्त आनंदाने यात्रेत तल्लीन झाले होते. महिला आणि पुरुष भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन डोक्यावर फेटे परिधान केले होते. ढोल आणि झांजपथकाबरोबरच वारकऱ्यांची दिंडी सहभागी झाली होती. देवस्थानचे भोईराज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या हातामध्ये भगवे झेंडे, मुखामध्ये करंजेश्वरीच्या जयजयकाराच्या घोषणा आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून देवस्थानचा चारदिवसीय शिमगा महोत्सव सुरू होणार असून, त्यापूर्वीच पुण्यातील सुवर्णकारांनी देवीचा ९०० ग्रॅम सुवर्ण मुखवटा तयार करून वेळीच उपलब्ध करून दिला आहे. ढोलपथक, टाळमृदंगाचा गजर, जयजयकाराच्या घोषणा यामुळे सारे वातावरण दुमदुमून गेले होते.
-----
फुलांनी सजवलेले वाहन
फुलांनी सजवलेल्या एक वाहनामध्ये देवीची चांदीची पालखी विराजमान होती. त्यामध्ये देवीचे रूपे अर्थात सुवर्ण मुखवटा सर्वांना दर्शन घेता येईल, अशा पद्धतीने ठेवण्यात आला होता. त्यामुळे देवीच्या लखलखीत सुवर्ण मुखवट्याचे अर्थात नव्या रूपाचे सर्वांनाच दर्शन घडले. यंदाच्या शिमगा महोत्सवात सुवर्ण मुखवटा पालखीमध्ये विराजमान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com