केळुसला उद्यापासून कुलदेवता वर्धापन

केळुसला उद्यापासून कुलदेवता वर्धापन

Published on

केळुसला उद्यापासून
कुलदेवता वर्धापन
म्हापणः वेंगुर्ले तालुक्यातील केळुस (खुडासवाडी) येथील जागृत देवस्थान ब्राह्मण अंबाजोगाई कुलदेवता मंदिराच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित २५ व २६ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २५) धार्मिक कार्यक्रमांबरोबर रात्री आठ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ, मळगाव (ता. सावंतवाडी) यांचा नाट्यप्रयोग, गुरुवारी (ता. २६) सकाळी आठपासून विविध धार्मिक कार्यक्रम, श्री चरणी अभिषेक, पूजा, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी चारपासून ग्रामस्थांची भजने, सायंकाळी सात वाजता म्हापण येथील विठ्ठल-रखुमाई वारकरी भजनांचा कार्यक्रम, रात्री नऊ वाजता बाबी कलिंगण प्रस्तुत नेरुर येथील कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन साटम बंधू व ग्रामस्थांनी केले आहे.
.....................
वेंगुर्ले येथे शुक्रवारी
कविता गायन स्पर्धा
वेंगुर्ले ः नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने चौथी ते सातवीतील मुलांसाठी पाठ्यपुस्तकातील कविता गायन स्पर्धा शुक्रवारी (ता. २७) दुपारी ३.३० वाजता नगर वाचनालय संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात आयोजित केली आहे. ज्येष्ठ कवी कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ ला हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात वेंगुर्ले शहर व परिसर मर्यादित विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कविता गायनाची स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना ५००, ३००, २०० रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे आवाहन वाचनालयातर्फे केले आहे.
.....................
रुग्णवाहिकेचे आज
शिरोड्यात लोकार्पण
वेंगुर्लेः टांककर-शेट्ये ट्रस्ट या सामाजिक क्षेत्रात कार्यरत सौजन्याने असणार्‍या ट्रस्टच्या शिरोडा व परिसरांतील जनतेच्या आरोग्य सेवेच्यादृष्टीने नवीन अ‍ॅम्ब्युलन्स ऑटो चालक-मालक संघटना शिरोडा यांना लोकार्पण सोहळा उद्या (ता. २४) सायंकाळी ५ वाजता आरवली येथील पणशीकर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेट्ये यांनी केले आहे.
......................
वेंगुर्ले नगरपालिकेच्या
पदाधिकाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्ले ः माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नगराध्यक्ष दिलीप गिरप व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचा सत्कार भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व वेंगुर्ले मंडळ अध्यक्ष पपू परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. याप्रसंगी नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, नगरसेविका सुषमा प्रभू-खानोलकर, आकांक्षा परब, काजल गिरप, शीतल आंगचेकर, गौरी माईणकर, रिया केरकर, गौरी मराठे व अधिकारी अभिजित पाटील उपस्थित होते.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com