विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
Published on

26649

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

सावंतवाडीतील स्नेहसंमेलन; शाळा क्र. ६ ‘आयएसओ’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः शहरातील भटवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ६ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि आयएसओ मानांकन प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. विविध स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविले.
शाळेला संरक्षक भिंत बांधून देऊन सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते राजू भालेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दीपाली भालेकर, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील करडे, राज्यस्तरीय जिजाऊ माता पुरस्कार प्राप्त शिक्षिका सायली लांबर, विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापन करणाऱ्या रेखा कांबळे व रिया पाल या सर्वांचा सन्मान केला. विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन झाले.
यावर्षी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते हे मानांकन प्रदान केले. सायंकाळी स्वच्छतादूत आणि युवा प्रबोधनकार सगुण जाधव यांनी संत गाडगेबाबा हा एकपात्री नाट्य प्रयोग सादर करून समाजप्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम केले. ​या कार्यक्रमाला सविता परब (गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी), सहदेव चव्हाण (आयएसओ समन्वयक कोकण विभाग), कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख सावंतवाडी), दिलीप भालेकर (शिक्षणतज्ज्ञ), संतोष तळवणेकर (जिल्हाध्यक्ष, राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग), सतीश धुमाळे (मुख्याध्यापक, वि. स. खांडेकर हायस्कूल) आणि प्रा. पोळ (अभिनव ॲकॅडमी सावंतवाडी) आदी उपस्थित होते.
​कार्यक्रमाला आरोग्य व क्रीडा समिती सभापती सुधीर आडीवरेकर यांनी १०,००० रुपये, शिक्षणतज्ज्ञ भालेकर यांनी ५,००० रुपये आणि पालकवर्गाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्षा पूनम तुयेकर, ईश्वरी तेजम, गुरुप्रसाद तेजम, जान्हवी वारीक, अश्विनी गावडे, दीपा गावडे, मयुरेश सुतार आणि शिक्षकवृंद केशव जाधव, सायली लांबर, रेखा कांबळे, रिया पाल आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com