सावंतवाडीत सुस्वर हरिभजनांचा निनाद
swt232.jpg
26711
सावंतवाडी ः ऑटो रिक्षा सेना चालक–मालक संघटनेतर्फे आयोजित भजन स्पर्धेला प्रतिसाद लाभला.
सावंतवाडीत सुस्वर हरिभजनांचा निनाद
स्पर्धेला रसिकांचा प्रतिसाद ः कारीवडे हेळेकर प्रासादिक मंडळ प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः शिवजयंती तसेच २८ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑटो रिक्षा सेना चालक–मालक संघटनेतर्फे निमंत्रित भजनी मंडळांची भव्य भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
तालुक्यातील एकूण सात भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांमध्ये संत गोरा कुंभार भजन मंडळ कोलगाव, मुसळेश्वर प्रसादिक भजन मंडळ दिर्बादेवी, दीर्घादेवी प्रसादिक महिला भजनी मंडळ कोलगाव, कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ तळवडे, रायकर प्रसादिक भजन मंडळ सराटा, श्री हेळेकर प्रसादिक भजन मंडळ कारीवडे तसेच घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ, घोडेमुख यांचा समावेश होता.
उत्कृष्ट सादरीकरण करत श्री हेळेकर प्रसादिक भजन मंडळ, कारीवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दीर्घादेवी प्रासादिक महिला भजन मंडळ, कोलगाव यांनी द्वितीय, कुलदेवता प्रसादिक भजन मंडळ, तळवडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
वैयक्तिक पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे ः उत्कृष्ट गायक-भक्ती सावंत (दीर्घादेवी प्रसादिक महिला भजन मंडळ, कोलगाव)
उत्कृष्ट तबला-महंत नेमन (कुलदेवता प्रसादिक भजन मंडळ, तळवडे), उत्कृष्ट पखवाज-सागर वारखंडकर (श्री हेळेकर प्रासादिक भजन मंडळ, कारीवडे), उत्कृष्ट झांज-शिवरुद्र सावंत (दीर्घादेवी प्रसादिक महिला भजन मंडळ, कोलगाव), उत्कृष्ट कोरस-घोडेमुख प्रसादिक भजन मंडळ, घोडेमुख.
स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, सावंतवाडी नगर परिषदेच्या नगरसेविका स्नेहा नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे, भजनी बुवा संघटनेचे खजिनदार राजू मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
परीक्षक म्हणून शहाजान शेख, विजय माधव, सुधीर धुमे यांनी काम पाहिले. त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व चषक देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष व नगरसेवक संजू परब, विनायक कोठल्या, राजन भांगले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पराडकर, संदेश राऊळ यांनी केले. संदेश रावळ यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष धर्मवीर सावंत, सचिव भाई धरणे, खजिनदार जयवंत रसाळे, पोलिसपाटील संदेश राऊळ, नानू रावळ, बाळू वालावलकर, यशवंत बेटे, सुनील तानावडे, सुभाष तावडे, मनोहर मसुरकर, सर्व रिक्षा चालक-मालकांनी परिश्रम घेतले. देवस्थानचे विश्वस्त नीलेश वाटवे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

