निगुडेत शिवाजी महाराजांचा जयघोष

निगुडेत शिवाजी महाराजांचा जयघोष

Published on

swt234.jpg
26651
निगुडे ः येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

निगुडे गावठणवाडी येथे
शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ ः श्री देव गावठणकर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, निगुडे गावठणवाडी व कासकरटेंब यांच्या संयुक्त विद्यमाने निगुडे गावठणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निगुडेचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सर्वेश गावडे, गावठणकर देवस्थान समितीचे अध्यक्ष धनंजय गवंडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गावडे, निगुडे माऊली देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र गावडे, पोलिसपाटील सुचिता मयेकर, सुरेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देव गवंडे, श्रीधर गावडे, कविता गावडे, माजी सैनिक नाना खडपकर, गुंडू गावडे, विठू गवंडे, बापू गावडे, संतोष आंबेकर, महेंद्र गावडे, विष्णू बांदेकर, संदेश गावडे आदी मान्यवरांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या आयोजनात हातभार लावणाऱ्या या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे समीर गावडे यांनी, शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी मावळ्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने येथे शिवजयंती साजरी करून महाराजांचे विचार समाजात रुजवण्याचे कार्य सुरू आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे सांगितले. आभार प्रदर्शन विठू गवंडे यांनी केले. यावेळी अजित मयेकर, सावळाराम गवंडे, न्हानू जाधव, मिलिंद गावडे, मयुरेश गावडे, आपा गावडे, बापू गावडे, साईनाथ गवंडे, अमित गावडे, गोपाळ मोरजकर, अनय गावडे, नवनाथ मोरजकर, प्रताप गावडे आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com