इन्फिगो हॉस्पीटलमध्ये रेटिनातज्ज्ञ
इन्फिगो आयकेअरमध्ये आजपासून
रेटिनातज्ज्ञ डॉ. कामत करणार तपासणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : मधुमेह शरीराच्या इतर अवयवांबरोबरच डोळ्यांवर गंभीर परिणाम करतो. वेळेवर निदान व योग्य उपचार न केल्यास दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच गेली पाच वर्षे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला येऊन प्रसिद्ध रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. या महिन्यात ते उद्या (ता. २४) साई लॉजसमोर, लांजा आणि २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान साळवी स्टॉप येथील इन्फिगो हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहेत.
कोकणात पूर्णवेळ रेटिनातज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या विविध रुग्णालयांमध्ये रेटिना तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये शंकर नेत्रालय (चेन्नई) येथून उच्च प्रशिक्षित डॉ. कामत रुग्णांची रेटिना तपासणी करून औषधोपचार आणि गरज असल्याने शस्त्रक्रिया करतात.
रेटिनातज्ज्ञ डॉ. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाते. विशेषतः मधुमेही रुग्णांनी वर्षातून एकदा किंवा गरज भासल्यास दोनदा रेटिना तपासणी करून घेणे आवश्यक आहे. रुग्णांनी नोंदणी करून डॉ. कामत यांच्याकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

