आधूनिक यंत्रणेद्वारे स्तन कर्करोगाची तपासणी
- ratchl२३३.jpg-
P26O26663
चिपळूण ः कंपनी प्रतिनिधींचे स्वागत करताना सुश्मिता पाटील, स्नेहल साळवी, डॉ. वृषाली स्वामी, डॉ. मुग्धा बेलवलकर, डॉ. देविका, आरोही पाचांगणे आदी.
-----
आधुनिक यंत्रणेद्वारे स्तन कर्करोगाची तपासणी
परशुराम रुग्णालय; मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः एमइएसएएम परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट लोटे व अमनोरा येस फाउंडेशनसिटी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम रुग्णालयात स्तन कर्करोग तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. या कार्यक्रमात १०० महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी परिसरातील गावागावामध्ये शिबिरांचे आयोजन करून मोफत स्तन कर्करोग तपासणी केली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
महिलांमधील स्तनांचा कर्करोग प्रकर्षाने जाणवत आहे. वेळीच त्याची तपासणी होऊन उपचार व्हावेत, कोकणातील रुग्णांना याचा दिलासा मिळावा या हेतूने परशुराम रुग्णालयात ही अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक असलेल्या iBreastexam मशिनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. सचिन उत्पात, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपम अलमान, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. दीप्ती चव्हाण, पंचकर्म विभागप्रमुख डॉ. वृषाली स्वामी, पीआरओ सुष्मिता पाटील यांच्यासह रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, युई लाईफ सायन्सेस कंपनीचे प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांना गंधाली देसाई व नीरजा साळेकर यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात मशिनची कार्यपद्धती, तपासणीची अचूक प्रक्रिया, रुग्ण समुपदेशन व अहवाल प्रणालीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १०० महिलांची मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे आणि प्रारंभिक अवस्थेत निदान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. परशुराम हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र अमनोरा येस फाउंडेशनसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान, रोगाचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि जनजागृती मोहिमेतून महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत आहे.
------
चौकट
महिलांनी नियमित तपासणी करावी
ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यासाठी गावोगावी वाडीवस्तीवर मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जाणार आहेत. या शिबिरातून मोफत कर्करोग तपासणी केली जाणार आहे. परशुराम रुग्णालयात हे मशिन आता नेहमीच उपलब्ध असणार असून, महिला याचा लाभ घेऊ शकतात. महिलांनी नियमित तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

