तळवणेत घराला लागली शॉर्टसर्किटने आग

तळवणेत घराला लागली शॉर्टसर्किटने आग

Published on

प्राथमिक अंदाज व्यक्त; पाच लाखांचे नुकसानसकाळ वृत्तसेवा

आरोंदा, ता. २३ : तळवणे मठवाडी येथील रहिवासी गोपाळ ऊर्फ रामदास वसंत गावडे यांच्या घराला लागलेली आग शॉर्टसर्किटने असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला; मात्र यात गावडे यांचे पूर्ण घर व घरातील सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यात बरेच नुकसान झाले आहे. गावडे हे कामानिमित्ताने कोल्हापूर येथे गेले होते, तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती. तिच्या सोबत त्यांचा बारा वर्षांचा मुलगा होता. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. शुक्रवारी (ता. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक ही आग लागली.

घर बंद असल्याने तत्काळ मदत करणे कठीण झाले; मात्र ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील, कपाट, जीवनावश्यक वस्तू, छप्पर, कपाटातील कपडे, रोख, कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. महसूल अधिकारी अनुजा भास्कर, ग्रामपंचायत अधिकारी एस. बी. बगळे यांनी पंचनामा करून पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. या आगीत गावडे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना या प्रसंगातून उभे राहण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चौकट
ग्रामपंचायतीचा सर्वाधिक खर्च
जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला २०२४-२५ या वर्षात प्राप्त झालेल्या निधीतील सर्वाधिक ४९ कोटी ५१ लाख २१ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. कोषागारातून ४९ कोटी ५९ लाख ४५ हजार रुपये म्हणजेच मंजूर निधी पेक्षा जास्त निधी ग्रामपंचायत विभागाला प्राप्त झालेला आहे. जानेवारी अखेर या विभागाने ४३ कोटी ६७ लाख २३ हजार रुपये निधी खर्च केला आहे. उद्दिष्टांच्या ८८ टक्के खर्च केला आहे. केवळ १२ टक्के म्हणजेच ५ कोटी ९२ लाख २२ हजार रुपये खर्च शिल्लक आहे. सर्वाधिक निधी प्राप्त होऊनही खर्चाच्या टक्केवारीत हा विभाग अन्य विभागांच्या पुढे आहे, परंतु शिल्लक १२ टक्के खर्च करण्यासाठी या विभागाला अहोरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण अखर्चित निधी सहा कोटींच्या जवळपास आहे.

चौकट
दोन विभागांची कासवचाल
महिला व बालकल्याण विभागाने २१ टक्के तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ४९.६१ टक्के खर्च केला आहे. म्हणजेच दोन वर्षांत या दोन्ही विभागांना उद्दिष्टांच्या ५० टक्के खर्च सुद्धा साध्य करता आलेला नाही. महिला व बाल कल्याण विभागाला तीन कोटी ६० लाखाचा निधी मंजूर होता. त्यातील दोन कोटी २० लाख ७ हजार रुपये निधी कोषागारातून प्राप्त झालेला आहे; मात्र, त्यातील केवळ ४५ लाख ७५ हजार रुपये या विभागाला खर्च करता आलेले आहेत. हा मोठा चिंतेचा विषय आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागास पाच कोटी निधी मंजूर होते. त्यातील केवळ १५ लाख २६ हजार रुपये निधी प्राप्त असताना त्यातील केवळ ७ लाख ६२ हजार रुपये निधी या विभागाने खर्च केले आहेत. ही सुद्धा बाब गंभीर आहे.

कोट
२०२४-२५ या आर्थिक वर्षात प्राप्त निधी खर्च करण्याची मुदत मार्च अखेर संपणार आहे. आमचा जानेवारी अखेर खर्च १०० टक्के झालेला नाही, परंतु मार्च २०२६ अखेर हा खर्च १०० टक्के पूर्ण होणार आहे. त्यासाठी नियोजन केलेले आहे. यासाठी सबंधित यंत्रणांकडून वारंवार आढावा घेण्यात येत आहे.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

चौकट
जिल्हा परिषदेला प्राप्त व खर्च निधी (लाखांत)
विभाग*प्राप्त निधी*खर्च*शिल्लक*टक्केवारी
बांधकाम*३५०३.८६*२७८२.७०*७२१.१६*७९
ग्रामपंचायत*४९५९.४५*४३६७.२३*५९२.२२*८८
शिक्षण*१६१३.४९*१००३.७०*५८६.३०*६४
आरोग्य*४१७.९१*३१०.२५*१०७.६६*७४.२४
लघुपाटबंधारे*७०८.२७*४६८.२१*२४०.०६*६६
पशुसंवर्धन*२४६.२*१५०.७९*८६.४१*६४.९०
महिला व बालकल्याण*२२०.०७*४५.७५*१७४.३२*२१
ग्रामीण पाणी पुरवठा*१५.३६*७.७४*७.७४*४९.६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com