कुडाळ येथे रविवारी शऱीरसौष्ठव स्पर्धा

कुडाळ येथे रविवारी शऱीरसौष्ठव स्पर्धा

Published on

कुडाळ येथे रविवारी
शरीरसौष्ठव स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा १ मार्चला येथील एस. एन. देसाई चौक (कॉलेज) येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती ''स्वस्तिक''चे संस्थापक धीरज परब यांनी दिली. स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) मागील सात वर्षे विविध आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. अविरतपणे सात वर्षे विविध सामाजिक उपक्रम संस्था यशस्वीरित्या करत आहे. ''ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग'' हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता यंदा आठव्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन मान्यतेने होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यास ''महाविजेता स्वस्तिक श्री'' किताब, ३० हजार रोख व चषक तसेच बेस्ट पोझर ५ हजार, मोस्ट इम्प्रोव्हेड ५ हजार अशी बक्षिसे दिली जातील. स्पर्धा ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० आणि ७० प्लस कि.ग्रॅ. या पाच गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक गटासाठी अनुक्रमे प्रथम ३,५५५ व चषक, ३,१११ व चषक, २,५५५ व चषक, २,१११ व पदक, १,५५५ व पदक, १,१११ व पदक, मेडल अशी बक्षिसे आहेत. मेन्स फिजिक्स स्पर्धेसाठी अनुक्रमे ५०००, ४०००, ३०००, २०००, १००० व प्रत्येकी चषक अशी बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्वस्तिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com