गृहीत धरल्यानेच खेर्डीने दाखवला हिसका
- ratchl२३२.jpg-
२६O२६६९५
चिपळूण ः विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव. शेजारी मान्यवर.
----
‘खेर्डीने’च दाखवला हिसका !
प्रशांत यादव ः विजयी उमेदवारांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः ज्यांना गृहित धरून राजकारण करत होता त्याच खेर्डीने हिसका दाखवला. यापुढे सुधारला नाहीत तर उद्या लोक तुम्हाला कायमचे घरात बसवतील, हे लक्षात ठेवा. आम्हीही तुमच्याच शाळेत शिकलो आहोत. तुम्ही काय करू शकता? हे माहीत आहे, असा राजकीय टोला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील महायुतीच्या विजयी उमेदवार सत्कार सोहळ्यात लगावला.
खेर्डी येथील यादव यांच्या साईदरबार मंदिरासमोरील मैदानावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हाभरातून विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते म्हणाले, नेहमी काम करणाऱ्यांवर टीका होत राहते. आमच्यावर तर रोज टीका सुरू आहे. ज्या वेळेस टीका होते, नावं ठेवली जातात त्या वेळी आपण योग्य ट्रॅकवर आहोत, हे लक्षात ठेवावे. ज्या वेळेस टीका होणार नाही तेव्हा आपण कुठेतरी चुकतोय, हे समजून जावे. ज्याच्यावर टीका होते त्याचे भवितव्य उज्ज्वल असते. आमच्यावर सुरू असलेल्या टीकेला कधीही उत्तर दिले नाही. मात्र, पक्षाने दखल घेत आज जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे टीकाकारांना आपण धन्यवाद देतो. जोपर्यंत आपण जमिनीवर राहून कार्यकर्त्यांसोबत असतो तेव्हा कार्यकर्ता विसरत नाही. या निवडणुकांत अनेक दिग्गज पराभूत झाले; मात्र, नेता आणि कार्यकर्ता असा आमचा समन्वय होता म्हणूनच विजयाचे व यशाचे श्रेय मिळाले. या यशाची जाणीव ठेवून आज कार्यकर्ते, पदाधिकारी व विजयी उमेदवारांचा सन्मान आणि आभार समारंभ होत आहे. आपल्या अडीअडचणी, संघर्षकाळात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ दिली. मी तत्त्वांशी, विचारांशी एकनिष्ठ राहून नेहमीच राजकीय भूमिका घेतली आहे. कार्यकर्ता, गावाला कमीपणा येईल असे काहीही केले नाही म्हणूनच निवडणुकीत मोठे यश मिळाले. भविष्यात एकत्र राहून काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. वाद, टीकेपेक्षा पक्षाचे काम मोठे आहे आणि तेच पुढे न्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
------
....त्यांना निवडणूक काळात उत्तर देऊ !
निवडणुकीवेळी अनेक उमेदवारांना माहिती नसेल की, आमची टीम पहाटे उशिरापर्यंत कसे राजकीय काम करत होती. मतदारांशी संपर्क व बैठका कशा घेतल्या जात होत्या. त्यातूनच आजचे यश दिसून येत आहे. कार्यकर्ता दुखावला जाणार नाही, त्याला योग्य सन्मान मिळायला हवा. ग्रामपंचायत निवडणुकीची चिंता नाही; मात्र, बॅनरबाजीचे भांडवल करायला ज्यांनी सुरवात केली त्यांना निवडणूक काळात उत्तर देऊ, असे यादव यांनी ठणकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

