मालवण येथे १४ मार्चपासून नाट्यगीत, नाट्यप्रवेश स्पर्धा
मालवण येथे १४ मार्चपासून
नाट्यगीत, नाट्यप्रवेश स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अष्टपैलू कलानिकेतन यांच्यावतीने दरवर्षी सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा आणि नाट्यप्रवेश असा दोन दिवसांचा कार्यक्रम १४ व १५ मार्चला भरड येथील श्री दत्तमंदिर या ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित केला आहे. यात १४ मार्चला नाट्यगीत गायन स्पर्धा, तर १५ ला नाट्यप्रवेश असे नियोजन केले आहे.
नाट्यगीत स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. बाल गट (१२ वर्षांपर्यंत), युवा गट (१३ ते २० वर्षांपर्यंत) आणि खुला गट (२१ वर्षांवरील) अशा तीन गटांत स्पर्धा होणार आहे. बालगटासाठी अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये व प्रमाणपत्र, आकर्षक भेटवस्तू तसेच उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना रोख २०० रुपये व प्रमाणपत्र, युवा गटासाठी अनुक्रमे १२००, ८००, ५०० रुपये, प्रमाणपत्र व चषक तसेच या गटातील उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना रोख ३०० रुपये व प्रमाणपत्र तसेच खुल्या गटासाठी अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, प्रमाणपत्र व चषक तसेच या गटातील उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना ५०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी वेशभूषा व रंगभूषा आयोजकांकडून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपली नावे १० मार्चपर्यंत रत्नाकर सामंत यांच्याकडे द्यावीत. प्रत्येक गटात प्रथम येणाऱ्या पंधरा स्पर्धकांना संधी देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

