गाडगेबाबांना अभिप्रेत शहर बनवूया
swt2312.jpg
26700
सावंतवाडी ः ‘महास्वच्छता’ अभियानाचा समारोपप्रसंगी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर व इतर मान्यवर.
गाडगेबाबांना अभिप्रेत शहर बनवूया
अनिल निरवडेकर ः सावंतवाडीत ‘महास्वच्छता’ अभियानाचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः स्वच्छतेमुळे आरोग्य सुदृढ राहते आणि समाज निरोगी बनतो, असा संदेश देत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित ''महास्वच्छता'' अभियानाचा समारोप उत्साहात पार पडला. प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, कचरा करू नका, घराभोवती स्वच्छता ठेवा; शहर आपोआप स्वच्छ राहील, असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘स्वच्छता कर्मचारी हा माणूसच असून आपण केलेली घाण साफ करताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गटारात उतरून किंवा कचऱ्यात काम करताना होणारी यातना लक्षात घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. नागरिकांनी स्वच्छता राखली तर सफाई कर्मचाऱ्यांचे कामही सुलभ होईल आणि शहर स्वच्छ-सुंदर बनेल.’’
सावंतवाडी नगर परिषद आयोजित या अभियानाच्या समारोप कार्यक्रमास आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन व वित्त सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुनीता पेडणेकर, नीलम नाईक, स्नेहा नाईक, सायली दुभाषी, माजी नगरसेवक विलास जाधव, ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र टेमकर, स्वच्छता विभागाचे अधिकारी वैभव अंधारे विनोद सावंत तसेच कर्मचारी, विद्यार्थी, पोलिस प्रशासन, महिला बचतगट व महिला मंडळ सहभागी झाले.
शहरातील विविध भागांत स्वतंत्र पथकांद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांच्या सहभागामुळे अभियान यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी ''स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि कचरामुक्त शहर'' करण्याची सामूहिक शपथ घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

