निवारा शेड कामाचे
पाट येथे भूमिपूजन

निवारा शेड कामाचे पाट येथे भूमिपूजन

Published on

२६७२१

निवारा शेड कामाचे
पाट येथे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २३ ः पाट हायस्कूल तिठा येथे विद्यार्थ्यांसाठी व प्रवाशांकरिता प्रवासी निवारा शेड बांधकामाचे भूमिपूजन रविवारी (ता. २२) शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कामासाठी आमदार नीलेश राणे यांच्या निधीतून सुमारे १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पाट हायस्कूल तिठा येथे निवारा शेड नसल्याने विद्यार्थी तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत निवारा शेडची ग्रामस्थांची वारंवार मागणी होती. ही आवश्यकता लक्षात घेऊन या निवारा शेडसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत आमदार राणे यांनी तत्काळ १० लाख रुपये मंजूर केले. या विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी शिवसेनेचे सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, पंचायत समिती सदस्य सचिन देसाई, विष्णू फणसेकर, शिवसेनेचे अजित राऊळ, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य संजय गोसावी, विशाल वेंगुर्लेकर, अनिल सुतार, प्रगती राऊळ, स्वरा हळदणकर, शिवसेना विभागप्रमुख दत्ता साळगावकर, बाळू राणे, उपेंद्र रावले, माजी निवृत्त पोलिस अधिकारी कोचरेकर, आबा कोचरेकर, शाखा प्रमुख (श्रीरामवाडी) भाई खवणेकर, पाटचे माजी सरपंच समाधान परब, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत तसेच कोचरा, म्हापण, पाटचे ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com