तळवणेत घराला लागलेली आग 
शॉर्ट सर्किटने असल्याचा अंदाज

तळवणेत घराला लागलेली आग शॉर्ट सर्किटने असल्याचा अंदाज

Published on

swt2322.jpg
26740
तळवणे ः तलाठी अनुजा भास्कर, ग्रामपंचायत अधिकारी एस. बी. बगळे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. सोबत गोपाळ गावडे व इतर. (छायाचित्र ः मदन मुरकर)

तळवणेत घराला लागली शॉर्टसर्किटने आग
प्राथमिक अंदाज व्यक्त; पाच लाखाचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २३ : तळवणे मठवाडी येथील रहिवासी गोपाळ उर्फ रामदास वसंत गावडे यांच्या घराला लागलेली आग शॉर्ट सर्किटने असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला; मात्र यात गावडे यांचे पूर्ण घर व घरातील सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यात बरेच नुकसान झाले आहे. गावडे हे कामानिमित्ताने कोल्हापूर येथे गेले होते, तर त्यांची पत्नी माहेरी गेली होती .तिच्या सोबत त्यांचा बारा वर्षांचा मुलगा होता. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. शुक्रवारी (ता. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक ही आग लागली.
घर बंद असल्याने तत्काळ मदत करणे कठीण झाले; मात्र ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील, कपाट, जीवनवश्यक वस्तू, छप्पर, कपाटातील कपडे, रोख, कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. महसूल अधिकारी अनुजा भास्कर, ग्रामपंचायत अधिकारी एस. बी. बगळे यांनी पंचनामा करून पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. या आगीत गावडे यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना या प्रसंगातून उभे राहण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com