

ठेकेदार त्रस्त ः ‘सर्व शिक्षा अभियान’ मधील कामेसकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा दुरुस्तीची मोठ्या प्रमाणात कामे केली असून सुमारे दोन कोटींची बिले शिक्षणाधिकारी यांच्या टेबलावर धूळ खात पडली आहेत. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देतील का? असा प्रश्न ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुमारे २६ शाळा दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. या कामांना निधी उपलब्ध असल्याने ठेकेदारांनी ही कामे प्रधान्याने पूर्ण केली असून कामांची बिले जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी सादर केली आहेत; मात्र ही बिले प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या टेबलावर गेले पंधरा दिवस पडून आहेत. शिक्षणाधिकारी यांच्याकडून या बिलांकडे दुर्लक्ष केला जात असून या मागचे कारण काय? असा प्रश्न ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा निधी पूर्णपणे खर्च करण्याबाबत कडक धोरण आखले असून संबंधित अधिकारी कामांची बिले मंजुरीसाठी दिरंगाई करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. असे असताना कामांची बिले पंधरा दिवस टेबलावर ठेवून संबंधित अधिकाऱ्यांनी आपली रत्नागिरी येथे बदली करून घेतली आहे.
दरम्यान, त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार शासनाने दिला आहे; मात्र त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ठेकेदारांमधून होत आहे. याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ
शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.