सीए, करसल्लागारांनी क्रीडा संस्कृतीही जपावी

सीए, करसल्लागारांनी क्रीडा संस्कृतीही जपावी

Published on

-rat२३p६.jpg-
२६O२६६७२
रत्नागिरी : सीए व करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आयोजित स्पोर्ट्स कार्निव्हलमध्ये विविध स्पर्धांमधील विजेत्यांसमवेत मान्यवर सीए राजशेखर अॅंथोनी, राजेश सोहोनी, मंदार जोशी, रमाकांत पाथरे आदी.
-------
करसल्लागारांनी क्रीडा संस्कृती जपावी
सीए अॅंथोनी ः ‘स्पोर्ट्स कार्निव्हल’ला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : सीए व करसल्लागारांच्या क्षेत्रात कामाची धावपळ असते, वेळेत काम करावेत लागते. या कामामुळे ताणतणाव येऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी क्रीडासंस्कृती जपत तब्येत सांभाळणे व सुधारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए राजशेखर अॅंथोनी यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखा आणि करसल्लागार असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स कार्निव्हलच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर राजेश सोहोनी, संतोष भगत व सुबोध पवार, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा- क्रिकेट विजेता- क्रेझी फोर, उपविजेता- सीए रॉकर्स. प्रत्येक सामन्यातील सामनावीर- प्रणव दामले, शैलेश काळे, अमित काटे, सौरभ लाड, भास्कर आंबेकर, अथर्व पंगेरकर, सुरेंद्र सुकडे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज- पवन अवसरे, सर्वोत्कृष्ट फलंदाज- अमित काटे, मालिकावीर- अमित काटे (७२ धावा व ५ बळी). बुद्धिबळ- वरद पेठे, साईप्रसाद साळवी, टेबलटेनिस एकेरी अभिजित पटवर्धन, शौनक भावे, टेबलटेनिस दुहेरी- अभिजित पटवर्धन व राजेश गांगण, आयेशा अघाडी व राजेश सोहोनी. कॅरम महिला एकेरी- स्नेहा भोसले, मिनल काळे, कॅरम पुरुष एकेरी शैलेश काळे, साईप्रसाद साळवी, कॅरम दुहेरी- शैलेश काळे, अभिजित बेर्डे, बॅडमिंटन पुरुष एकेरी- वरद पटवर्धन, रोहित अडाव, बॅटमिंटन महिला एकेरी- रिद्धी शेट्टी, रोशनी देसाई, बॅडमिंटन पुरुष दुहेरी- सौरभ लाड, मयुरेश जोशी, बॅडमिंटन महिला दुहेरी- आयेशा अघाडी व रिद्धी शेट्टी व सांची, रेणू. रिले ४X१०० पुरुष- विजेता अमित नेवरेकर टीम, हर्षद पटवर्धन टीम, रिले ४X१०० महिला- आयेशा अघाडी टीम, रश्मी आठवले टीम.
----

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com