रत्नागिरी ः ४ टक्के वाढीव कराचा बोजा

रत्नागिरी ः ४ टक्के वाढीव कराचा बोजा

Published on

पालिका लोगो


रत्नागिरीकरांवर ४ टक्के वाढीव कराचा बोजा
विशेष सभेत मंजुरी ः अग्निशमन सेवा, दिवाबत्ती कर प्रत्येकी २ टक्के
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : रत्नागिरी पालिकेतील शिवसेना-भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी रत्नागिरीकरांवर कराचा बोजा टाकला आहे. आजच्या विशेष सभेमध्ये अग्निशमन सेवा कर आणि दिवाबत्ती कर प्रत्येकी २ टक्के लागू केला आहे. स्वच्छता कराचा आणखी बोजा नको म्हणून या दोन टक्के वाढणाऱ्या सेवाकरातून सूट मिळाली आहे. तरी एकूण ४ टक्के कर यावर्षीपासून लागू झाला आहे. गेली चार वर्षे प्रशासकीय राजवट होती तेव्हा हा कर का लागू केला नाही, आम्हाला नागरिकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. त्यांना अधिक सुविधा देण्याऐवजी कर लादणे योग्य वाटत नाही, अशी भूमिका शिवसेना, भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या काही मोजक्याच नगरसेवकांनी मांडली. पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने दोन कर लागू केले आहेत.
पालिकेची आजची विशेष सभा सकाळी अकरा वाजता नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. पालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे त्यामुळे ती सुधारावी, उत्पन्नाचे स्रोत वाढावेत, यासाठी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यानुसार विषय पत्रिकेवर येणाऱ्या विषयांना चर्चा करून मंजुरी द्यायची आहे, असे मत सुर्वे यांनी व्यक्त केले. अग्निशमन दल अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने २ टक्के अग्निशमन सेवा कर लागू केल्यास वर्षाला सुमारे २५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत येणार आहेत. सुमारे ३० हजार ६१९ मालमत्ताधारकांकडून हा कर वसूल केला जाणार आहे. याला सभागृहाने मंजुरी दिली. त्यानंतर दिवाबत्ती सेवेवर २ टक्के कर बसवण्याबाबत विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला. यालाही सभागृहाने मंजुरी दिली; परंतु त्यानंतर तिसरा स्वच्छता कर लागू करण्याबाबत सभागृहापुढे चर्चा सुरू झाली. या वेळी मात्र सभागृहातील शिवसेनेचे नगरसेवक सुहेल मुकादम, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि ठाकरे गटाचे नगरसेवक अमित विलणकर यांनी हा विषय उचलून धरला. आपली सत्ता येऊन अवघे तीन महिने झाले. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. आपण त्यांच्यावर एक नाही तरी तीन कर लादणार आहोत, हे योग्य नाही. यावर मुख्याधिकारी वैभव गारवे म्हणाले, ‘‘१९९२ पासून हे कर लागू करण्याबाबत तरतूद आहे; परंतु आपण त्याच्यावर कधी निर्णय घेतला नाही. आता आपण पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे निर्णय घेण्याची गरज आहे. कर वाढ केली तरी हा पैसा नागरिकांवरच खर्च होणार आहे. आजपर्यंत आपण पालिकेच्या फंडातून हे कर भरत होतो. प्रशासकीय कारभार ४ वर्षे सुरू होता तेव्हा हे कर का लागू केले नाही, आता आम्ही आल्यावर हे कर लागू केले तर नागरिकांमध्ये वेगळा आणि चुकीचा संदेश जाईल, असे सांगत विरोध केला. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेता स्वच्छता कर स्थगित ठेवला.

दृष्टिक्षेपात
प्रशासकीय राजवटीत कर का लागू केले नाही
सत्तेत आल्यावर कर लादल्याने चुकीचा संदेश
१९९२ पासून कायद्यात होती तरतूद


...म्हणून स्थगित
केला स्वच्छता कर
अनेक नागरिकांना वार्षिक घरपट्टी किंवा पाणीपट्टी दोनशे ते शंभर रुपये येते. तीच भरताना त्यांना नाकीनऊ येते. त्यात प्रत्येक घरावर महिन्याला ३० रुपयेप्रमाणे स्वच्छता कर लागू केला तर ३६० रुपये वाढीव कर भरणे शक्य होणार नाही. याबाबत सभागृहाचे एकमत झाल्यामुळे स्वच्छता कर स्थगित ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com