अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप

Published on

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
लांजातील तरुणाला जन्मठेप
२०२३ मध्ये ठार मारण्याची धमकी देत केले होते कृत्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या लांजा तालुक्यातील तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आशुतोष अनिल जाधव (वय २०, ता. लांजा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १४ जुलै २०२३ला सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली होती.
आरोपी आशुतोष जाधव याने शाळेतून घरी परतणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या दोन शाळकरी मुलांना भीती घालून पळवून लावून अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने एका उपकेंद्राच्या मागे जबरदस्तीने नेऊन अत्याचार केले. ही बाब कुणाला सांगितलीस, तर ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने आई-वडिलांसह शेजाऱ्यांना ही घटना सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपास लांजा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देशमुख करत होते. तपासात पोलिसांनी आशुतोष जाधव याला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सोमवारी (ता. २३) या खटल्याचा निकाल अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी ११ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com