शिर्के प्लाझाच्या तळघरातील मीटरबॉक्सला आग

शिर्के प्लाझाच्या तळघरातील मीटरबॉक्सला आग

Published on

शिर्के प्लाझातील मीटरबॉक्सला आग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिर्के प्लाझा इमारतीच्या तळघरातील वीजमिटर शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या आगीत मीटर जळून खाक झाले. धुराचे लोळ बाहेर पडू लागल्यानंतर ही आग लागल्याचे दिसले. इमारत रिकामी करण्यास सांगितल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली. एवढ्यात अग्निशामन बंब दाखल झाला आणि त्यांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली.
शिर्के प्लाझा इमारत ही संपूर्ण वाणिज्य आस्थापना असलेली इमारत आहे. या इमारतीच्या तळघरातील सर्व आस्थापनांच्या वीज मीटरच्या बॉक्सला सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. तळघरात आग लागल्याने कोंडलेला धुर बाहेर पडण्यास वाव नव्हता. अग्निशामक दलाला या आगीची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी महेश साळवी, जवान संकेत साळवी, नरेश मोहीते, अग्निशामक चालक प्रवीण वाघेला अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. महावितरण वीजतंत्रीनी तातडीने येवून इमारतीचा वीजपुरवठा बंद केला. अग्निशमन अधिकारी महेश साळवी यांनी सर्व वाणिज्य गाळयामधील सर्वांना इमारती बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर मोठया धाडसाने तळघरात जावून वीजमिटरला लागलेली आग अटोक्यात आणली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी महवितरण वीजतंत्रीना सर्व मीटर बॉक्स तळघरातून बाहेर घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरु करू नये असे बजावले आहे. पालिका आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com