संगीत नाट्यमय कार्यक्रम
स्वराज्याच्या गर्जनेचा संगीताविष्कार
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर, नाट्यमय कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि येथील खल्वायन संस्थेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकमान्य टिळक : सहस्ररश्मी सूर्याचा अवतार’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम येत्या २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे होणार आहे.
ज्ञान, भक्तिपूर्ण कर्मयोग हेच भगवद्गीतेचे तात्पर्य आहे, हे सांगण्यासाठी मंडालेच्या तुरूंगात असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही गर्जना करणारे लोकमान्य टिळक. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्नसुद्धा बेधडक विचारत होते. त्याच कणखरपणाने बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी ते आंदोलनात उतरले आणि फाळणी र द्द केली. टिळकांचा जन्म रत्नागिरीत झाला आणि त्यामुळेच त्यांचे रत्नागिरीशी अतूट नाते आहे. याचे औचित्य साधून जन्मभूमीत महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि खल्वायन या संस्थेचे आयोजन व सादरीकरणातून लोकमान्यांचे स्मरण हा एक सुवर्णयोग आहे.
या कार्यक्रमाचे लेखन संगीत नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले आहे. गायक चैतन्य गोडबोले (सांगली), गायिका मधुरा सोमण, प्रदीप तेंडुलकर, विनायक उर्फ राजू जोशी, मनोहर जोशी आणि खल्वायनचे कलावंत कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना संगीतसाथ देवाशीष बापट, पार्थ परांजपे, संकेत पाडळकर, राम तांबे आणि प्रसन्न प्रभूतेंडोलकर करणार आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

