अमित खोत यांची संयोजकपदी निवड
26957
अमित खोत यांची
संयोजकपदी निवड
मालवण : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्यावतीने १९ मार्च गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे २३ वे वर्ष असून, समितीच्या मालवण संयोजकपदी अमित खोत यांची निवड करण्यात आली. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संस्थापक भाऊ सामंत व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत भरड दत्त मंदिर येथे समितीची बैठक झाली. या बैठकीत खोत यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी संयोजक प्रशांत हिंदळेकर, बंटी केनवडेकर, भूषण साटम, रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर, कृष्णा ढोलम, सौगंधराज बादेकर, अरविंद मयेकर, अमृता फाटक, अमिता निवेकर आदी उपस्थित होते. भव्य स्वरुपात चित्ररथ, आकर्षक चलचित्र देखावे, ढोलपथक, वेशभूषा स्पर्धक आणि तमाम मालवणवासीयांच्या सहभागातून भगव्या उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्यादिवशी सायंकाळी निघणार आहे. त्यादृष्टीने नियोजन व प्राथमिक चर्चा करण्यात आली. या सोहळ्याच्या नियोजनाची पुढील अतिमहत्त्वाची बैठक शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजता भरड दत्त मंदिर येथे आयोजित केली आहे, अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

