वायंगणी येथे १५ मार्चला तालुकास्तर विविध स्पर्धा
वायंगणी येथे १५ मार्चला
तालुकास्तर विविध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २४ ः ज्ञानदीप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्चला सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी येथे तालुकास्तर विविध स्पर्धांचे गटवार पुढीलप्रमाणे आयोजन केले आहे. गट क्रमांक १ (पहिली ते चौथी) साठी कथाकथन स्पर्धा ‘प्राणीकथा’ या विषयावर होणार असून वेळ ३ ते ४ मिनिटे राहील. विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २००, उत्तेजनार्थ प्रथम १५०, उत्तेजनार्थ द्वितीय १०० रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येतील. गट क्रमांक २ (पाचवी ते सातवी) साठी वक्तृत्व स्पर्धा ‘छत्रपती शिवरायांचे पराक्रम’ या वेळेवर घेण्यात येणार असून वेळ ५ ते ६ मिनिटे आहे. यासाठी अनुक्रमे ७००, ५००, ३००, उत्तेजनार्थ प्रथम २००, उत्तेजनार्थ द्वितीय १५० व प्रत्येकी चषक देणयात येईल.
गट क्रमांक ३ (आठवी ते दहावी) साठी ‘शोध आणि संशोधक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असून वेळ ५ ते ६ मिनिटे देण्यात येईल. विजेत्यांना १०००, ७५०, ५००, उत्तेजनार्थ प्रथम ३५०, उत्तेजनार्थ द्वितीय २५० व प्रत्येकी चषक. गट क्रमांक ४ (अकरावी व बारावी) साठी वक्तृत्व स्पर्धा ‘लोकशाहीची सद्यस्थिती’ या विषयावर असून वेळ ५ ते ६ मिनिटे आहे. विजेत्यांना १५००, १०००, ७५०, उत्तेजनार्थ प्रथम ५००, उत्तेजनार्थ द्वितीय ४०० व प्रत्येकी चषक. गट क्रमांक ५ (तेरावी ते पंधरावी) साठी ‘जलव्यवस्थापन-काळाची गरज’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा असून वेळ ६ ते ७ मिनिटे आहे. विजेत्यांना २०००, १५००, १०००, उत्तेजनार्थ प्रथम ७५०, द्वितीय ५०० रुपये व चषक. गट क्रमांक ६ (तालुका ग्रंथालय कर्मचारी) साठी कादंबरी समीक्षा स्पर्धा (कादंबरीचे नाव-पानिपत-शिवाजी सावंत किंवा ''कोसला''-भालचंद्र नेमाडे) होणार असून वेळ ५ ते ६ मिनिटे व बक्षिसे अनुक्रमे १५००, १०००, ७५०, उत्तेजनार्थ प्रथम ५५०, द्वितीय ४५० व चषक अशी बक्षिसे आहेत. स्पर्धकांनी नावे ७ मार्चपर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन ज्ञानदीप ग्रंथालय अध्यक्ष प्रकाश पेडणेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

