''इसोटी मातो़ंड'' भजन मंडळ प्रथम

''इसोटी मातो़ंड'' भजन मंडळ प्रथम

Published on

swt244.jpg
26870
तुळस ः भजन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.

‘इसोटी मातोंड’ भजन मंडळ प्रथम
तुळस येथील स्पर्धा ः ‘जानवली लिंगेश्वर पावणादेवी’ द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ ः तुळस येथे श्री जैतिराश्रित भजनप्रेमी मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत श्री देव इसोटी प्रासादिक मंडळ, मातोंड यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्ह्यातील एकूण चौदा भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेत उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, जानवली (कणकवली), तृतीय गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ, उत्तेजनार्थ प्रथम गुरुकृपा भजन मंडळ न्हावेली-घोडेमुख, उत्तेजनार्थ द्वितीय हेळेकर प्रासादिक भजन मंडळ, कारीवडे, उत्तेजनार्थ तृतीय श्री देवी भावई प्रासादिक भजन मंडळ झाराप यांनी यश मिळविले. उत्कृष्ट गायक व हार्मोनिअम-योगेश मेस्त्री, उत्कृष्ट पखवाज-शुभम गावडे, उत्कृष्ट तबला-सूरज पालव, उत्कृष्ट मंजिरी-अभी भगत, उत्कृष्ट अभंग- रोहित निर्गुण, उत्कृष्ट कोरस-श्री देव इसोटी, मातोंड सावंतवाडा, शिस्तबद्ध संघ-श्री हेळेकर, कारिवडे यांना प्राप्त झाला.
स्पर्धेस प्रमुख पाहुणे तुळस गावाचे सरपंच रश्मी परब, शंकर घारे, जयवंत तुळसकर, रुपेश कोचरेकर, नितीन लिंगोजी, देवस्थान मानकरी बाळू राऊळ, बाबा राऊळ, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामसुंदर उर्फ तुषार राय, अवधूत मराठे, पोलिसपाटील सागर सावंत, बुवा वैभव परब, परीक्षक मोहन मेस्त्री, परीक्षक स्वप्नील गोरे, बुवा पुरुषोत्तम परब आदी उपस्थित होते. पारितोषिक वितरण जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, राष्ट्रवादी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, विजय रेडकर, वैभव परब, बंड्या होडावडेकर, गोपाळकृष्ण लिंगोजी आणि स्वप्नील गोरे, मोहन मेस्त्री यांच्या हस्ते झाले. सलील लिंगोजी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com