शिमगोत्सवाला प्रारंभ
करजुवेत शिमगोत्सवाचा धार्मिक उत्साह
ग्रामदेवता दुर्गामाता तळेकरीण देवी ; फाकपंचमीने सुरुवात, गावभेटी, पालखी फेऱ्यांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावची ग्रामदेवता स्वयंभू पुरातन देवस्थान येथील दुर्गामाता तळेकरीण देवीचा शिमगोत्सव १ मार्च रोजी होणार आहे. फाकपंचमीने या शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून, या दिवशी गावातील प्रत्येक वाडीत होळी उभी करण्यात आली. आज देवीचे खेळे गावभेटीला निघणार आहेत.
येत्या शनिवारी (ता. २८) गोडेसण आहे. या दिवशी सकाळी पालखी सजवली जाईल. सायंकाळी सर्व गावकरी एकत्र येऊन सूरमाड तोडून आणून तो सहाणेसमोर उभा केला जाईल. १ रोजी सर्व विधीवत पूजा होऊन शिमगा होणार आहे. सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान होम लागेल. यानंतर सर्व मानकरी, खुमदार व सर्व गावकरी व भक्तगण होमामध्ये नारळ अर्पण करतील. यानंतर पालखी होमाला प्रदक्षिणा घालेल. यानंतर नवस फेडणे, पालखी नाचवणे हे कार्यक्रम होतील. रात्री आठ वाजता पालखी पहिल्या मानासाठी तिसंगवाडी येथे येईल. शिमगोत्सवात २ मार्चला दुसरा मान व ३ मार्चला तिसऱ्या मानासाठी पालखी तिसंगवाडी येथे येईल. ४ ला गुरव मान, ५ ला बाचिम मान निवईवाडी, ६ ला डावल मान डावलवाडी, ७ ला सकाळी निवईवाडी अशोक नलावडे यांच्या घरी व सायंकाळी तिसंगवाडी येथे पालखी जाईल. ८ व ९ मार्चला घरभोवणीसाठी पालखी तिसंगवाडी, १० ला साडीचोळीसाठी विचारेकोंड येथे असेल. यानंतर सुर्वेकोंड व सुतारवाडी घरभोवणी होईल. ११ ला दुर्गवलीवाडी घरभोवणी, १२ ला निवईवाडी व करजुवे तिसंगवाडी येथे, १३ ला कावडी, १४ ला आडावरची डावलवाडी, ब्राह्मणवाडी, डावल (मोरेवाडी), १५ ला लोहार, कुडेवाडी, १६ ला डावलवाडी, १७ ला भाटले, गुरव भंडारवाडी फेरा होईल. याच दिवशी शिंपणे कार्यक्रम होईल आणि शिमगोत्सवाची सांगता होईल. १८ ला रूपे काढली जातील आणि १९ ला पाडव्याच्या दिवशी माड तोडला जाईल.
भक्तांनी सहभागी व्हावे...
करजुवे गावची ग्रामदेवता स्वयंभू पुरातन देवस्थान येथील दुर्गामाता तळेकरीण देवीचा शिमगोत्सवात सर्व ग्रामस्थ व भक्तगणांनी उपस्थित राहून शिमगोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सर्व मानकरी, खुमदार व गावकरी मंडळींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

